करिना कपूरकडे ‘गुड न्यूज’, ही आहे तारीख

By  
on  

करिना कपूर पुन्हा एकदा सर्वांना गुड न्यूज देणार आहे. आश्चर्यचकित झालात ना. करिनाकडे पुन्हा एकदा गोड बातमी आहे की काय. अहो, पण तसं काही नाही. करिना कपूर ‘गुड न्यूज’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात करिनाचा नायक अक्षय कुमार आहे.

एका मुलाखतीदरम्यान अक्षयने सांगितले  “मी आणि करिना एका सिनेमात एकत्र येत असून या सिनेमाचं नाव गुड न्यूज आहे.” धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या हा सिनेमा विनोदी असल्याचे बोलले जात आहे. मिडीया रिपोर्ट्सुनसार ‘गुड न्यूज’च्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता सांभाळणार आहेत.

धर्मा प्रोडक्शनने याबाबतची अधिकृत माहिती ट्विटरवरुन नुकतीच दिली. केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहयोगाने या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे. अक्षय आणि करिनासोबतच या सिनेमात कियारा अडवाणी, दिलजीत दोसांज हे कलाकारसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. पुढच्याच वर्षी 19 जुलै 2019 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, करिना कपूर अक्षयसोबत काम करण्यास उत्सुक आहे.‘वीरे दी वेडींग’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्वरित करिनाच्या हातात हा सिनेमा आला. या सिनेमाची कथा एका कपलवर आधारित असून निर्मात्यांनी करिनासोबत अक्षयची निवड केली आहे.

‘हाऊसफुल 4’ सिनेमाची शुटींग पूर्ण केल्यानंतर अक्षय कुमार या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. तर करिनाला ‘वीरे दी वेडींग’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांचा ब्रेक घेऊन कुटुंबासोबत आणि खास करुन आपला मुलगा तैमुरसोबत वेळ घालवण्याची इच्छा होती. तिने या इच्छेप्रमाणे कुटुंबासमवेत छान वेळ घालवल्यावर आता पुन्हा ‘बॅक टु वर्क’साठी सज्ज झाली आहे. करिनाचा पोस्ट प्रेग्नन्सीनंतरचा ‘वीरे दी वेडींग’ हा पहिलाच सिनेमा होता. या सिनांमे खुप चांगली कमाई करुन 100 कोटींचा गल्ला जमवला.

सर्वांनाच आता ब-याच वर्षानंतर ‘गुड न्यूज’द्वारे करिना आणि अक्षयच्या ऑन-स्क्रिन केमिस्ट्रीची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share