By  
on  

अरुंधती फेम मधुराणी म्हणते, " मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत.."

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

सोशल मिडीयावर अरुंधती नेहमीच सक्रीय असते. मालिकेविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी , सीन्सविषयी त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल ती सतत व्यक्त होत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट-व्हिडीओंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. पडद्यामागच्यासुध्दा अनेक गोष्टी मधुराणी इथे शेयर करते. मधुराणीने नुकताच एक  तिचा पुस्तक वाचतानाचा फोटो शेयर करत लक्ष वेधून घेतलंय. 

अरुंधती फेम मधुराणी म्हणते, " मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं , भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं....वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय.
सेटवर एक , मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात ... तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची.... जमेल तसं...दोन पानं कधी चार . पण वाचायचं...वाचत राहायचं.जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
सध्या मी वाचत असलेली पुस्तकं
१. मंद्र . भैरप्पा
२. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने
३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख.

तुम्ही काय वाचताय???" 

 

जागतिक ग्रंथदिनी मधुराणीची ही पोस्ट चर्चेत आहे. सर्वांनी तिला आपण वाचत असलेल्या पुस्तकांची नावं कमेट्समधून सांगितली आहेत. तेव्हा तिनेही प्रतिक्रीया देत सगळेचजण वाचतायत याचा आनंद व्यक्त केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive