By  
on  

Photos : 'चंद्रमुखी'मधल्या नैना चंद्रापुरकरचा हा साजश्रृंगार पाहिलात का?

अमृता खानविलकरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चंद्रमुखी हा  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला असून यात ती चंद्रा ही नायिका साकारतेय. तर दौलतराव देशमाने ह्या ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत हॅंण्डसम हंक अभिनेता आदिनाथ कोठारे पाहायला मिळतोय. 

प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे.  नुकतंच या सिनेमातील नैना चंद्रापूरकर या लावणीसम्राज्ञीचा उलगडा झाला आहे. 

नैना चंद्रापूरकरच्या व्यक्तिरेखेत अभिनेत्री प्राजक्ता माळी पाहायला मिळतेय. 

चंद्रा आणि नैनाच्या लावणीच्या जुगलबंदीचं एक गाणं सुध्दा अलिकडेच प्रदर्शित झालं.

कशी वाटली नैना चंद्रापूरकर म्हणत प्राजक्ता लिहते, मला तर बुवा शिवलेली नव्हे खरी नऊवार नेसून, सगळे खरे सोन्या- मोत्याचे दागिने घालून, प्रिय अमृताला खडूस नेत्रकटाक्ष देत नाचायला जाम मज्जा आली ....

प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive