ह्रता दुर्गुळेचं स्पष्टिकरण, ''मी मन उडू उडू मालिका...''

By  
on  

ह्रता दुर्गुळे ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय नायिका. दुर्वा आणि फुलपाखरुनंतर ह्रताची मन उडू उडू ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि ्अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. घराघरांत या मालिकेचे चाहते आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून या मालिकेला ह्रताने रामराम ठोकल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सर्वत्र ही बातमी वा-यासारखी पसरली आणि चाहते नाराज झाले होते. या चर्चांवर नुकतंच ह्रताने नुकतंच यावर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. 

हृता दुर्गुळे ही मालिका सोडत असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. ती ही मालिका का सोडते? याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले होते. मात्र नुकतंच या सर्व चर्चांवर हृताने स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी ही मालिका सोडलेली नाही’, असे तिने या मुलाखतीदरम्यान म्हटले.

हृता दुर्गुळेने नुकतंच एका वृत्त  वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तसेच चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका”, अशी विनंती तिने केली.

Recommended

Loading...
Share