By  
on  

'अनन्या' सिनेमाच्या माध्यमातून हृताचे मोठ्या पडद्यावर पदार्पण!

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अनन्या' सिनेमात हृता प्रमुख भूमिकेत असून तिची ही भूमिका आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळी असल्याचं दिसतंय.

'अनन्या' सिनेमाच्या या पोस्टरमध्ये हृताने सायकलवर हात मोकळे ठेवले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे. यावरून ती एक आनंदी आयुष्य जगत असल्याचे दिसतंय. पण 'अनन्या' या नावावरून तिची जिद्दी आणि धाडसी गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

'अनन्या' सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी आतुर आहेत. 'अनन्या' नावाची एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत अभिनेत्री स्पृहा जोशीने अनन्या साकारली होती. त्यानंतर या एकांकिकेचं नाटकात रूपांतर झाले. मग या नाटकात अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने 'अनन्या'चे पात्र साकारले आणि आता या नाटकाचे सिनेमात रूपांतर झाले आहे. ज्यात 'अनन्या' म्हणून हृता भेटीला येत आहे

.

या सिनेमाचं शुटिंग हे २०१९ मध्येचं झालं आहे, मात्र लॉकडाऊनमुळे हा सिनेमा रखडला होता. पण आता हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सर्वच जण या सिनेमासाठी उत्सुक आहेत.


'दुर्वा' मालिकेच्या माध्यमातून हृताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर 'फुलपाखरू' या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. आणि आता 'अनन्या' सिनेमाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यामुळे हृताला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे अनेक चाहते आतुर आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive