By  
on  

स्वप्नपूर्ती! 'पावनखिंड' फेम अभिनेता अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर!

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर यांनी साकारली होती. अजय पुरकरांनी ही भूमिका नुसती साकारलीचं नाहीतर त्यांनी ती भूमिका जगली. असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियतेसोबतचं खूप प्रेम देखील मिळाले.

याच अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी एक घर बांधले आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्या पावनखिंडीत आपलं एक घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांनी पूर्ण केलीच...

 

'पावनखिंड' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका तर साकारली पण त्या पावनखिंडीच्या भूमीत स्वतःचे घर असणे, याहून मोठं भाग्य ते काय ??

पावनखिंड सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर हा येत्या १९ जूनला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर होणार आहे. बॉक्स ऑफिसवर पावनखिंड सिनेमाने विक्रम केलाच होता, हेच प्रेम प्रेक्षक प्रवाह पिक्चरवर १९ तारखेला लागणाऱ्या पावनखिंडला देखील देतील अशी भावना अजय पुरकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान या नवीन घरासाठी अजय पुरकर यांचं अभिनंदन होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे चाहते त्याला शुभेच्छा देखील देत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive