By  
on  

'लेक बापाच्या काळजाचा हळवा कोपरा असते';डॉ.अमोल कोल्हेंची पोस्ट वाचलीत का?

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक संभाजी अशा  ऐतिहासिक आणि  दमदार भूमिकांमधून रसिकांच्या  काळजाचा ठाव घेणारे सर्वांचे लाडके अभिनेते आणि राजकारणात असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर ते सतत सक्रीय असतात. त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते बरेच उत्सुक असतात. ते नेहमीच राजकारणाशी संबंधित किंवा एखादी सामाजिक किंवा मग मनोकंजन क्षेत्राशी निगडीत सोशल मिडीया पोस्ट शेयर करत लक्ष वेधून घेतात. पण नुकतीच त्यांनी एक भावूक करणारी पोस्ट शेयर केली आहे. अमोल कोल्हे यांच्या लेकीचा आद्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी खास व्हिडीओ शेयर करत वडील म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

या व्हिडीओत लेक आद्याचे बालपणापासून ते आत्तापर्यंतचे गोड फोटो अमोल कोल्हे यांनी पो स्ट केले आहेत. ते म्हणतात, 

''वेळ कसा भुर्रकन उडून जातो... घरट्याची एकेक काडी जमवता जमवता अचानक ध्यानात येतं..पिल्लू मोठं झालं..मुठीतून काळाची वाळू निसटत असली तरी जन्मतःच तिला हातात घेतल्यावर नकळत तरळलेल्या आनंदाश्रूंपासून तिचं हसणं, रडणं, रुसणं, मायेनं कुशीत शिरणं आणि आता आपली आई असल्याच्या थाटात समजावणं सगळं कोरलेलं असतं काळजावर..तिच्या नजरेत "हिरो"असण्याची प्रेरणा देत!

लेक बापाच्या काळजाचा हळवा कोपरा असते, बापाचा स्वाभिमान असते!

आद्या, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा''!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive