By  
on  

अशी रंगली बिग बॉस मराठीची सक्सेस पार्टी

मराठी टेलिव्हिजनवर मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्व चांगलच गाजलं. या निमित्ताने कलर्स मराठी वाहिनीची टिम आणि बिग बॉसमधील स्पर्धक आणि सूत्रसंचाल महेश मांजरेकर यांनी नुकतीच या कार्यक्रमाच्या यशानिमित्त पार्टी केली. या पार्टीत सर्वांनीच भरपूर धम्माल केल्याचे दिसून येत आहे. या पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले.

सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, मेघा धाडे, आस्ताद काळे, शर्मिष्ठा राऊत, सुशांत शेलार, स्मिता गोंदकर, भूषण कडू, प्राजक्ता धर्माधिकारी,रेशम टिपणीस, विनीत भोंडे आदी सर्वच स्पर्धक कलाकारांसोबत मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर उपस्थित होते. सर्वांनीच बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या या आयुष्यभरासाठीच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वच जण आनंदात आणि सेलिब्रेशन मूडमध्ये दिसले.

100 दिवस सुरु राहणा-या मराठी बिग बॉसच्या प्रवासाचे आपण सर्वच साक्षीदार होतो. पण या पहिल्या पर्वाचा किताब कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. पुष्कर, मेघा, सई, स्मिता, आस्ताद आणि शर्मिष्ठा यांच्यात फायनलची लढत रंगली आणि मेघाने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा किताब पटकावला.

शंभर दिवस हे सेलिब्रिटी राहिल्याने अनेक नाट्यमय घडामोडी बिग बॉसच्या घरात रंगल्या. नॉमिनेशन कार्य, विविध टास्क आणि रणनिती आखणे यांमुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करण्यात स्पर्धकांनी यश मिळवले.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive