ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

By  
on  

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारानंनतर त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतला. 

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी स्त्रीपात्र सोडून बहुतांश भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी आतापर्यंत ४० ते ४५ नाटकात काम केले होते. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही ते झळकले.

त्याबरोबरच ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले. पण टीव्हीवरील मालिका विश्वात ते फारसे रमले नाहीत. रंगभूमीवर कामाचा जिवंत अनुभव घेतल्यामुळे त्यांनी पुढे नाटकातच काम केले.

Recommended

Loading...
Share