बिग बॉस मराठीच्या ३ -या पर्वात धुमाकूळ घालणारी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री मीरा जगन्नात नेहमीच चर्चेत असते. यंदा ४ थ्या सीझनमध्येसुध्दा एका आठवड्यासाठी जात मीराने घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणून सोडले होते. मीरा फक्त एक आठवड्यासाठीच बिग बॉस मराठीच्या घरात आली होती हे जेव्हा महेश मांजरेकरांनी जाहीर केलं, तेव्हा सर्वंच सदस्यांचा जीव भाड्यांत पडला होता.
मीराने नुकताच एक कारनामा केला आहे. . मागच्याच आठवड्यात ती घरातून बाहेर पडली. ती पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरात आली होती. आता दत्तजयंतीच्या मुहूर्तावर मीराने नवी गाडी घेतली आहे. तिने ह्युंदाई कंपनीची ऑरा ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत ८ ते ९ लाखांच्या मध्ये आहे. या दत्तजयंतीला तिने ही गाडी घेतली आणि गाडीसोबतचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. एका फोटोत ती गाडीची मनोभावे पूजा करताना दिसतेय. तिच्या हातात हार आहे. दुसऱ्या फोटोत ती गाडीत बसलेली दिसत आहे.
मीराने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिलं, 'दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, घरच्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे, माझं पहिलं वाहन घेत आहे.' मीराच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोमो या भूमिकेमुळे प्रसिध्दी झोतात आलेली मीरा आता ठरलं तर मग या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय.