रंगमभूमी गाजवणरा अशी प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांची ओळख आहे. आपल्या नाटकांचे विविध विक्रम करणारा दामले प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. पण तरीही प्रशांत दामले यांना सुध्दा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५००वा नाट्यप्रयोग सादर केला. प्रशांत दामले सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. काही दिवसांपूर्वीच ते त्यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी संभाजीनगर येथे गेले होते. प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तेथील रस्त्याची अवस्था कशी आहे हे चाहत्यांची शेअर केलं होतं. एका वेबसाईटवर ही बातमी प्रसिध्द झाली होती.
या बातमीवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं “मुळात हे पुढची गोष्ट नाटकच अतिशय फालतू आणि दर्जाहीन आहे. त्या गोष्टीत काहीही जीव नाही.” नेटकऱ्याच्या या कमेंटवर प्रशांत दामले यांनीही त्यांच्या स्टाईलने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं, “बरं… त्याच नाटकाचे ५४७ प्रयोग झाले आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो की.” त्यांच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान प्रशांत दामले यांची ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक आणि दुसरं ‘सारखं काहीतरी होतंय’ ही दोन नाटकं सुरु आहेत.