By  
on  

'फ्रेंडशिप डे' निमित्ताने एचआयव्हीग्रस्त मुलांनी साजरी केली अनोखी 'पार्टी'

पार्टी म्हणजेच मस्ती आणि धिंगाणा.आपल्या रिअल लाईफ सारखीच रिल लाईफमध्ये अशीच दोस्तांच्या पार्टीची गोष्ट ‘पार्टी’ या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीमने  नुकताच गोरेगाव येथील एचआयव्हीग्रस्त मुलांचे संगोपन करणाऱ्या डीझायर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेमध्ये, सर्व कलाकारांच्या उपस्थितीत 'फ्रेंडशिप डे साजरा केला.

कलाकारांनी मुलांशी संवाद साधत, त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या. संस्थेच्या मुलांनीही 'पार्टी; सिनेमातील 'भावड्या' या गाण्यावर ठेका धरत, फ्रेंडशिप डे च्या या धम्माल 'पार्टी'चा मनमुराद आनंद लुटला. सिनेमातील 'भावड्या' या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, संगीतसृष्टीतील दोन मित्रांनी, मैत्रीवर आधारित असलेले हे गाणे, खास मित्रांसाठी सादर केले आहे. अवधूत गुप्ते आणि अमितराज या  मित्रांचे हे गाणे 'फ्रेंडशिप डे'च्या मुहूर्तावर लॉंच झाले.

अमितराजच्या चालीवर अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या 'भावड्या' या गाण्याचे लिखाण सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केले आहे. मित्राच्या हळदीचे हे भन्नाट गाणे, प्रेक्षकांना नादखुळा करून सोडणारे आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी सर्व कलाकारांना सलग दोन रात्र काम करावे लागले होते. शिवाय, गाण्यात हळदीचा प्रसंग उभा करण्यासाठी तब्बल ५० किलो हळदीचा वापर यात करण्यात आला असल्याचे समजते. जोशपूर्ण अशा या गाण्याची झिंग चित्रीकरण संपल्यानंतरही उतरली नव्हती. कारण, रात्रभर काम करूनदेखील 'पार्टी'च्या सर्व टीमने हे गाणे सेटवर मोठ्या आवाजात लावत, संपूर्ण क्र्यू मेंबरसोबत ताल धरला होता. शिवाय, उरलेली हळद उधळवत या गाण्याची मजा लुटली.

'पार्टी'चा हॅंगओव्हर देणा-या या सिनेमात, सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर ,प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत असून, या सहाजणांची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा, प्रेक्षकांना 'फ्रेंडशिप डे' चे अनोखे सरप्राईज घेऊन येत आहे.

नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्स प्रस्तुत 'पार्टी' हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive