आई आणि मुलीच्या नात्याचे विविध पैलू मांडणाऱ्या आगामी 'बोगदा' सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच लॉंच करण्यात आला. सोशल मिडीया अकाउंटवरुन हे प्रदर्शित करण्यात आलं. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या प्रमुख भूमिकेत आहेत.
मायलेकीच्या नात्यामधला भावबंध या सिनेमात मांडण्यात आले आहे. ''व्हीस्लिंग वूड' च्या पुढाकाराने साकार झालेल्या या 'बोगदा' चित्रपटाचे नितीन केणी प्रस्तुतकर्ते असून, दिग्दर्शिका निशिता केणीसोबत करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद या तिकडींनी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
[video width="848" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/BOGDA-MOTION-POSTER.mp4"][/video]
या सिनेमातील एका नृत्याचे चित्रिकरण करण्यासाठी अभिनेत्री मृण्मयीला चक्क तलावात नृत्य करावे लागले .एका नृत्यासाठी तलावात चित्रिकरण करणं आवश्यक होतं आणि ही कथानकाची गरज होती. सिनेमाचं बरचसं चित्रिकरण कोकणात करण्यात आलं आहे. या नृत्याचं चित्रिकरण वेंगुर्ला येथील तलावात करणं गरजेचं होतं. हा तलाव निर्मनुष्य जागी आणि जीर्ण मंदिराजवळ होता. त्यात अनेक विषारी साप, शेवाळं यांचा वास होता. या सिनेमाच्या टीमला सर्वप्रथम हा तलाव स्वच्छ करण्याचं अभियान हाती घ्यावं लागलं, मग विषारी जीव यात नाही याची खात्री करुन मृण्मयीला या तलावात नृत्य करण्यास सांगण्यात आलं. मृण्मयीने कोणतीही भीती न बाळगता या तलावात नत्य करत एका टेकमध्येच चित्रिकरण पूर्ण केले. सर्वांनीच संपूर्ण टीमचे या कठीण चित्रिकरणानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे.
नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित- दिग्दर्शित ‘बोगदा’ हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.