By  
on  

सरफरोशच्या सिक्वेलमध्ये झळकणार जॉन अब्राहम

1999 साली आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नसरुद्दीन शाह यांच्या सदाबहार अभिनयाने सजलेला ‘सरफरोश’ हा सिनेमा सर्वांचाच आवडता आहे. आजही नव्वदच्या दशकातील सुपरहीट सिनेमे पाहताना ‘सरफरोश’चे नाव आवर्जुन घेतले जाते. आता तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल तयार होत असून महत्त्वाचं म्हणजे आमिरने साकारलेली भूमिका सिक्वेलमध्ये जॉन अब्राहम साकारणार आहे. खुद्द जॉननेच एका मुलाखती दरम्यान या वृत्ताला दुजोरा दिला.

जॉन मॅथ्यू मथान दिग्दर्शित सरफरोश’ या सिनेमाचे प्रेक्षक आणि समिक्षकांनी भरपूर कौतुक केले. दहशतवादावर आधारित या सिनेमात नक्षलवादाचासुध्दा उल्लेख करण्यात आला होता. ‘सरफरोश’च्या सिक्वेलबद्दल उत्साहात असलेला जॉन म्हणाला, “ सध्या आम्ही स्क्रिप्टवर काम करत असून पुढील वर्षी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होईल. संपूर्णपणे अॅक्शन आणि ड्रामाने हा सिक्वेल परिपूर्ण असणार आहे. जॉन मॅथ्यू हे असे एकमेव दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या घरी ‘सरफरोश’ पाहिल्यावर मी गेलो आणि त्यांना म्हणालो, तुम्ही काय उत्तम सिनेमा तयार केला आहे. ”

निखिल अडवाणी दिग्दर्शित  ‘बाटला ‘हाऊस एन्काउंटर’ सिनेमात जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असून तो या सिनेमाचा निर्मातासुध्दा आहे. तसंच लवकरच जॉनचा ‘सत्यमेव जयते’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive