By  
on  

पहिल्या पालकत्वासाठी मार्गदर्शन मिळणार 'स्पर्श वात्सल्याचा' कार्यक्रमात

आई-वडील होणं हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. बाळाबरोबर आपणसुध्दा पालक म्हणून एका नव्या भूमिकेत जन्म घेतो. नेहमीच वैविध्यपूर्ण विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणारी झी युवा वाहिनी म्हणूनच पहिल्यांदा पालक होणा-या जोडप्यांना मार्गदर्शन म्हणून 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम घेऊन येत आहे.

विविध विषय आणि सादरीकरणातील नावीन्याने अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी ही वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.

पहिलं बाळ जन्माला आल्यावर आयुष्याच्या नव्याने रंग भरले जातात. जीवनाच्या कॅनव्हासवर अनुभवांच्या रेषा रेखाटत आई-बाबा आपल्या बाळाचं संगोपन करतात आणि ते संगोपन करताना आजी आजोबांची सोबत असतेच. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे.

कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलाशी जोडल्या गेलेल्या भावना या कार्यक्रमातून प्रेक्षकांसाठी सादर केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदक मुंबईतील अनेक घरांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वयस्कर व्यक्तींशी, नातेवाईकांशी आणि प्रथमच पालक बनलेल्यांशी संवाद साधणार आहेत. ८ महिने ते दीड वर्षांची मुले असलेल्यांची मुलांची काळजी घेण्याची संकल्पना सुधारण्याचे ध्येय असलेल्या या कार्यक्रमामध्ये कुटुंबासोबत मजेदार गप्पांचासुध्दा समावेश आहे. त्यांच्या लहानांची काळजी घेण्याविषयीचे गंमतीदार आणि भावनिक अनुभव 'स्पर्श वात्सल्याचा' मधून पालक सांगू शकणार आहेत.

रसंवाद साधत असतानाच, निवेदक पालक आणि आजी-आजोबांना काही गंमतीदार खेळ खेळायला लावणार आहे आणि त्यातून कार्यक्रमाची रंजकता वाढणार आहे. तसेच या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे बाळ आणि 'स्पर्श वात्सल्याचा' मध्ये त्या दिवसातील त्याचे गोंडस क्षण टिपणे.

वेगळ्या धाटणीचा 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम झी युवावर येत्या ६ ऑगस्ट पासून संध्याकाळी ६.३० वाजता सादर करणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive