विठ्ठलावर निस्सीम भक्ती करणा-या संत तुकाराम यांच्या जीवनपट उलगडणारी ‘तु माझा सांगाती’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. आज घराघरांत ही मालिका आवडीने पाहिली जाते. लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकर या मालिकेत संत तुकारांमाची प्रमुख व्यक्तिरेखा साकारतो.
कलर्स मराठी वाहिनीवरील जवळपास गेली चार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका लवकरच आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. म्हणूनच या मलिकेसोबत चिन्मयचे भावनिक नाते फार दृढ झाले. यावेळी भावूक होत, चिन्मयने तुकारांमाच्या व्यक्तिरेखेतील एक फोटो सोशल मिडीया अकाउंटवर शेअर करत, एक कॅप्शन दिलं आहे.“निरंजनी आम्ही बांधियेले घर।निराकार निरंतर राहिलोसे॥ 'तू माझा सांगाती' आता अखेरच्या पर्वाकडे. #throwback #4years#तूमाझासांगाती”
https://www.instagram.com/p/Bl75Iqpld6T/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control
चिन्मय मांडलेकर हा मालिका, नाटक आणि सिनेमा क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच चिन्मय लेखन क्षेत्रात तितकाच सक्रीय असतो. 'तू माझा सांगाती' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिकेतील तुकारामांच्या जीवनावरील या प्रसंगांना प्रेक्षक आता मुकणार आहेत.