By  
on  

OMG! प्रियंकाने लपवली साखरपुड्याची अंगठी; दिल्ली विमानतळावर दिसली देसी गर्ल

देसी गर्ल आणि बॉयफ्रेंड निक जोनसच्या साखरपुड्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. पण नुकताच याचा एक पुरावा प्रसिध्दी माध्यमांच्या हाती लागला आहे. प्रियंका चोप्रा सिंगापूरला निकच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी गेली होती. आज ती भारतात परतली. दिल्ली विमानतळावर प्रियंका उतरली, मात्र कॅमे-याने तिला अचूक कैद केलं. विमानतळाबाहेर येताना प्रियंकाने हातातली अंगठी गुपचूप आपल्या बॅगेत ठेवली.आपल्याला कोणी पाहत नाही,असेच तिला वाटले. त्यामुळेच प्रियंका-निकच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब करावंच लागेल,असं दिसंतय.

व्हिडीओत तर प्रियंका अंगठी लपवताना स्पष्ट दिसून येत आहे. तिने विमानतळाबाहेर येताच आपल्या पॉकेटमध्ये हळूच अंगठी लपवून ठेवली आणि फॅन्ससोबत हस्तांदोलनही केले. सलमान खान स्टारर भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियंका-निकचा साखरपुडा झाल्याच्या बातम्याच फक्त सर्वांना मिळत होत्या, पण आता त्याचा पुराव मिळाला आहे. सध्या दोघेही लव्ह बर्ड्स एकमकांसोबत फिरण्याची कुठलीच संधी सोडत नाही. जिथे तू तिथे मी अशाप्रकारेच हे प्रेमीयुगूल हिंडताना दिसतंय.

[video width="640" height="640" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2018/08/viralbhayani_38285835_446127795869970_1624300955686141952_n.mp4"][/video]

हॉलिवूडवासी झाल्यापासून प्रियंका अनेक बॉलिवूड सिनेमांना रामराम ठोकत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसमुळे प्रियंका सतत चर्चेत असते. अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर ‘भारत’ सोडल्यानंतर तिने आता आणखी एका सिनेमाला रामराम केले. महत्त्वाचं म्हणजे, प्रियंका आता बॉलिवूडमधील मोठ्या प्रोजक्टलासुध्दा गुडबाय म्हणतेय.

डीएनएच्या वृत्तानुसार, प्रियंका आणि तिचे आवडते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे एका गॅंगस्टरच्या आयुष्यावर आधारीत गंगूबाई कोठेवाली या सिनेमानिमित्त एकत्र येणार असल्याचे एक वर्षापूर्वी समजले होते. पण प्रियंकाने ‘भारत’ नंतर हा सिनेमासुध्दा सोडला आहे. अगदी शेवटच्या क्षणीच तिने या सिनेमाला आपला नकार कळवल्याचे वृत्त आहे.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive