By  
on  

‘हम आपके है कौन’ला झाले 24 वर्ष पूर्ण; माधुरीने शेअर केले फोटो

हम आपके कौन या 90 च्या दशकातील सुपरहिट सिनेमाला 24 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त सौंदर्यवती अभिनेत्री माधुरीने या सिनेमाच्या आठवणींना आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर फोटो शेअर करत उजाळा दिला.“ या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन मला फार आनंद होत आहे. मला या सिनेमाचा एक भाग बनवल्याबद्दल मी दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे आभार मानते, असे माधुरीने म्हटले आहे.”

https://twitter.com/MadhuriDixit/status/1026088000235552773

90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज क्रॉस करून कमाई करणारा हम आपके कौन हा पहिला सिनेमा ठरला. राजश्री प्रोडक्शनने तयार केलेला ‘नदिया के पार’ या भोजपुरी सिनेमाचा हम आपके कौन हा हिंदी रिमेक होता. यात मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर आणि साधना सिंग प्रमुख भूमिकेत होते.

प्रेम आणि निशाची केमिस्ट्री सर्वांनाच भावली,सलमान खान आणि माधुरी दिक्षीत ही जोडी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. हा कौटुंबिक सिनेमा कोणालाच 100 वेळा पाहूनसुध्दा मन भरत नाही. हॅट्स ऑफ टीम ‘हम आपके कौन’ !

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive