बी टाउनचा चॉकलेट बॉय आणि हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा सर्वात आधी वरुणची गर्लफ्रेंड असल्याचे कळले होते, तेव्हा हजारो तरूणींचा हिरमोड झाला. वरुण कधीच आपल्या नात्याबद्दल काही बोलत नाही, पण नेहमीच तो गर्लफ्रेंड नताशासोबत फिरताना दिसतो.
पहिल्यांदाच वरुण धवनने नताशासोबतचा एक फोटो सोशल मिडीया अकाउंटवरुन शेअर केला. त्याने त्याला कॅप्शनसुध्दा दिलं आहे. आणि त्यावरुनच या दोघांचं गोड गुपित समजतंय. सध्या वरुणकडे अनेक सिनेमांचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचा आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई-धागा’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रोमोशन आणि इतर इव्हेंट्समुळे त्याचं शेड्यूल खुप बिझी असतं. पण या बिझी शेड्यूलमधूनसुध्दा त्याने नताशाला वेळ देण्यासाठी तिला लंडनला घेऊन गेला. दोघांनी तिथे भरपूर फिरुन खुप एन्जॉय केलं. एकमेकांसोबतचे क्षण आनंदात घालवून दोघंही नुकतेच मुंबईत परतले आहेत. त्यामुळे आता दोघांच्या या घट्ट रिलेशनशीपविषयी आणि लग्नाच्या अनेक चर्चा बी-टाउनमध्ये रंगू लागल्या आहेत.