By  
on  

‘गोल्ड’चं नवं गाणं,अक्षय कुमार आणि मौनी रॉय दिसले बंगाली अंदाजात

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा गोल्ड हा सिनेमा येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. हॉकी या खेळावर आधारित या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या सिनेमाचं ‘मोनो बिना’ हे नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे एक धमाल पार्टी सॉंग आहे.

https://youtu.be/Ywhwf0KwKhk

‘मोनो बिना’ हे गाणं अक्षय कुमार आणि अभिनेत्री मौनी रॉयवर चित्रित करण्यात आलं आहे. दोघांचासुध्दा या गाण्यातून जबरदस्त असा रेट्रो लूक समोर आला आहे. पारंपारिक बंगाली पोशाख परिधान करुन दोघांनीसुध्दा गाण्यावर मस्त ठेका धरला आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1026717352795234304

अक्षयनेसुध्दा ट्विट करुन या गाण्याची माहिती दिली. संगीतकार तनिष्क बागची याने या गाण्याला संगीत दिलं आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासोबत चर्चा करुन हे गाणे तयार करण्यात आले. मोनालिसावरुन गाणं ‘मोनो बिना’ करण्यासाठी अक्षयने सुचवले आहे. या गाण्यासाठी नवीन गायक यासिरला संधी देण्यात आली आणि त्याला साशा तिरूपती व मोनाली ठाकूरने या गायिकांनी साथ दिली आहे. संगीतकार तनिष्कच्या मते, ‘मोनो बिना’ हे रेट्रो लूकमधील क्लासिक गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडेल.

अभिनेत्री मौनी रॉय गोल्ड सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.सिनेमात ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. तिची सिनेमात बंगाली व्यक्तिरेखा आहे. मौनीच्या पहिल्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. रिमा कागती दिग्दर्शित गोल्ड  15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive