बी- टाउनमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख यांच्या प्रेमाचे दाखले आवर्जुन दिले जातात. दोघंही दोन गोंडस बाळांचे आई-बाबा आहेत. नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्यास रितेश आणि जेनेलिया पसंती देतात. रितेश देशमुख सध्या बॉलिवूड आणि मराठी सिनेमांच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो तर जेनेलिया त्यांच्या होम प्रोडक्शनच्या म्हणजेच निर्मिती आणि घरच्या जबाबदा-या सांभाळते. मुलांच्या संगोपनात व्यस्त असल्याने जेनेलियाला स्वत:साठी फार कमी वेळ मिळतो. म्हणूनच पती रितेशने जेनेलियाला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राईज दिलं.
आता रितेश बायकोला गिफ्ट देणार म्हटल्यावर आपल्याला साहजिकच वाटेल काही तरी मगहागडं सरप्राईज असेल, गाडी, गॅजेट किंवा हॉलिडे ट्रिप वगैरे....सेलिब्रिटी आहेत म्हणजे असंच काहीतरी गिफ्ट असणार, पण तसं अजिबातचं नाही...रितेशने लाडक्या जेनेलियासाठी चक्क खास स्वत: कॅरेमल चीज केक तयार केला आणि तिला सरप्राईझ दिले....मग काय, हे अनोखं गिफ्ट पाहून जेनेलियाबाई नवरोबावर प्रचंड खूश झाल्या.
https://www.instagram.com/p/BmKi79Vnezr/?taken-by=geneliad
अमूल्य असं हे गिफ्ट पाहून जेनेलियाने आपल्या सोशल अकाउंट साईटवरुन हा आनंद शेअर केला. जेनेलिया म्हणते, “ माझा वाढदिवस होता, आणि एकदा का तुम्ही आई झालात तर तुम्हाला स्वत:चा विसर पडतो. पण रितेशचे खुप खुप धन्यवाद. तो नेहमीच मला मी खास असल्याची जाणीव करुन देतो. त्याने खास माझ्यासाठी हा यम्मी..... कॅरेमल चीझ केक तयार केला. तो कधीच कुकींग किंवा बेकिंग करत नाही. पण त्याने फक्त आमच्यासाठी तो बनवला, मला फार छान वाटतंय.”
रितेश-जेनेलिया यांच्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण येत, राहो ही सदिच्छा....नांदा सौख्य भरे!