Exclusive:अभिनेत्री क्रांती रेडकरकडे आहे, गुड न्यूज?

By  
on  

‘ट्रकभर स्वप्न’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकर मागच्यावर्षी 2017 रोजी लग्नबेडीत अडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण क्रांतीने आपल्या लग्नाची बातमी जाहीर केली नव्हती. समीर वानखेडे या पोलिस अधिका-यासोबत एका खासगी सोहळ्यात ती विवाहबध्द झाली. महत्त्वाचं म्हणजे, आता लवकरच क्रांती सर्वांना गुड न्यूज देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्या घरी पाळणा हलणार, हे वाचून नक्कीच तुमची ......काय, अशी प्रतिक्रिया असणार. पण हो, क्रांतीचं हे गोड गुपित अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.

‘कोंबडी पळाली’ गाण्यामुळे घराघरांत क्रांती लोकप्रिय झाली.आपल्या दमदार अभिनयाने क्रांतीने सिनेसृष्टीत स्वत:चं एक वलय निर्माण केलं आहे. विनोदी किंवा गंभीर अशा दोन्हीही भूमिका ती नेहमी लिलया पेलते. ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’,’मर्डर मेस्त्री’,’नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘ऑन ड्युटी 24 तास’, अशा सिनेमांमधून क्रांतीचा सदाबहार अभिनय पाहायला मिळाला. तर ‘काकण’ या हद्यस्पर्शी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. क्रांती उत्तम नकलाकारसुध्दा आहे. बॉलिवूडमधील श्रीदेवी, हेमा मालिनी यांसारख्या अभिनेत्रींच्या उत्तम नकला ती करते.

‘ट्रकभर स्वप्न’ हा क्रांतीची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा येत्या 24 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. क्रांतीची ही गोड बातमी नक्की किती खरी,ती ब्रेक घेणार का  हे सर्व येणारा काळ ठरवेलच. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या उत्सुकतेवर लवकरच उत्तर मिळणार आहे.

Recommended

Share