By  
on  

OMG! राधें मॉंची वेबसिरीज, करतेय अभिनयात पदार्पण

नेहमीच आपल्या वाद-विवादांमुळे चर्चेत असणारी स्वयं घोषित आध्यात्मिक गुरू राधे मॉं लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हो... हे खरं आहे. ‘राह दे मॉं’या वेबसिरीजद्वारे ती अभिनय करणार आहे. या वेबसिरीजद्वारे ती भक्तांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.

‘राह दे मॉं’या वेबसिरीजमध्ये ती स्वत:चीच व्यक्तिरेखा साकारत असून तिने याचं चित्रिकरणसुध्दा स्वत:च्या घरीच पूर्ण केलं आहे. राधे मॉंबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तिने हा अनोखा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. या वेबसिरीजचे निर्माते रमण हांडा म्हणाले, “या वेबसिरीजच्या आधारे राधे मॉं यांना फक्त आपल्या भक्तांना भेटायंचं आहे.” पण ‘राह दे मॉं’ ही वेबसिरीज नेमकी कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्यापतरी काही स्पष्ट झाले नाही. परंतु राधे मॉंचे परिचित संजीव गुप्ता म्हणाले, अनेक कंपन्या या बेबसिरीजच्या प्रदर्शनासाठी आमच्या संपर्कात आहेत.

यापूर्वी राधे मॉंचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. सर्वत्र त्याचीच चर्चा होती त्यामुळे ती बरीच अडचणीत सापडली. आता ती वेबसिरीजमधून पदार्पण करतेय म्हटल्यावर तिला पडद्यावर झऴकण्याची किती हौस आहे, हे दिसून येतेय. आता या बसिरीजमुळे तिच्या अडचणी वाढतात की कमी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive