By  
on  

अज्याची शितली आता येतेय सिनेमात

‘लागिरं झालं जी’ मालिकेदेवारे घराघरांकत पोहचलेले अजिंक्य आणि शितली या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. महत्त्वाची बातमी म्हणजे यात शितलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर आता सिनेमात झळकणार आहे. नेहमीच आपल्या सहज- सुंदर आणि ग्रामीण बाजाने शिवानीने शितली साकारुन सर्वांची मनं जिंकली आहेत. तिच्या नव्या इनिंगची प्रेक्षक वाट पाहू लागले आहेत.

'युथट्युब' हा शिवानीचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या नावावरुनच तो तरुणाईवर आधारित असणार हा अंदाज बांधता येतो. या सिनेमाचा म्युझिक लॉंच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.'युथट्युब' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा प्रमोद प्रभुलकर यांनी सांभाळी असून संगीतकार पंकज पडघन यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. आर्या आंबेकर, सागर फडके, सायली पंकज आणि शिखा अजमेरा या गायकांच्या सुमधूर आवाजात या सिनेमाची गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत.

या सिनेमात शिवानीचा नायक कोण असणार, हे अद्यापतरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, तर शिवानीचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive