By  
on  

होम स्वीट होम सिनेमात पाहायला मिळणार रिमा लागू यांचा अखेरचा अभिनय

आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूड गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. बॉलिवूडची लाडकी आई म्हणून त्याचा नावलौकीक सर्वज्ञात आहे. सिनेमा, नाटक आणि मालिका या सर्वच माध्यमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. वर्षभरापूर्वी त्यांचे हद्यविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आणि एक सच्चा कलाकार हरपला म्हणून संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. पण महत्त्वाचं रिमाताईंचा अभिनय आपल्याला आगामी होम स्वीट होम सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे. हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

ऋषिकेश जोशी एक हरहुन्नरी अभिनेता आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. त्याचा ‘होम स्वीट होम’ हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘होम स्वीट होम’ या सिनेमात रिमा लागू यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे या कलाकारंच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत. रिमाजींच्या आठवणींना उजाळा देत अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नुकतंच आपल्या सोशल अकाउंटवर भावना व्यक्त केल्या. स्पृहा म्हणते, “रिमाताईंबरोबर स्क्रिन शेअर करायला मिळाली, हे माझं भाग्य आहे. आमच्या सर्वांच्या हा फार जवळचा सिनेमा आहे.” ,सिनेमाच्या संपूर्ण टीमने रिमाताईंना या माध्यमातून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/p/BmN3fv8AOxM/?taken-by=spruhavarad

प्रत्येकाला आपल्या घराबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो. मग ते घर कसंही असो लहान किंवा मोठं प्रत्येकाला ते जीवापाड प्रिय असतं. काहीचं तर घर घेण्याचं मोठं स्वप्नं असतं. अशीच घराभोवती गुंफलेली नाविन्यपूर्ण कथा असलेला ‘होम स्वीट होम’ हा सिनेमाचा गृहप्रवेश म्हणजेच प्रदर्शन येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण माहाराष्ट्रात होत आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive