By  
on  

मुलाच्या बॉलिवूड एन्ट्रीविषयी अक्षयने हे सांगितले....

खिलाडी कुमारचा गोल्ड सिनेमा आता 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. पण या दरम्यान एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. आज अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुले अभिनयात पदार्पण करत आहेत. आलिया भट, जान्हवी कपूर आणि आता सुहाना खान यामुळेच सुपरस्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव हासुध्दा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेवर अक्षयने स्पष्टीकरण नुकतंच दिलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान आरवच्या पदार्पणाविषयी अक्षयला विचारले असता, अक्षय म्हणाला, “ आरव खुप यंग आहे. अजुन त्याला त्याचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. मला नाही माहित की, त्याने त्याचे भविष्यातील प्लॅन्स काय ठरवले आहेत. त्याला बॉलिवूडमध्ये यायचं की नाही, हे पण मला नाही माहित.पण बॉलिवूडमधील करिअरसाठी मी त्याच्या मागे तगादा लावणार नाही. त्याला करिअरबाबतीत  स्वच्छंद वागण्यासाठी मी नेहमीच मुभा देतो.”

अक्षय पुढे सांगतो, “ इतर मुलांसारखाच आरवपण आहे. मुंबईत त्याचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आता तो पुढील शिक्षणासाठी लंडनला जाऊ इच्छितो आहे. तो स्वत:चे निर्णय स्वत:  घेण्यास सक्षम आहे. मला तो त्याला जे करण्याची इच्छा आहे, त्याबद्दल सांगतो आणि माझं काम फक्त फी भरणं असतं. पत्नी ट्विकंलसुध्दा माझा मुलगा आरव आणि मुलगी निताराची संपूर्ण जबाबदारी  व्यवस्थित पार पाडते.

कुटुंबाला नेहमी प्राधान्य देणा-या अक्षयच्या मुलाच्या बॉलिवूड कारकिर्दीची नेहमीच सर्वांना आतुरता असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive