By  
on  

मायलेकींच्या नात्याचा वेध घेणा-या बोगदा सिनेमाचा उलगडला टिझर

मराठी सिनेसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या सिनेमांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सृजनशील दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, या सिनेमांना प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास सोपे जाते. मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या 'बोगदा' या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. मायलेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टिझरमधून त्यांचे नाते उलगडते. शिवाय, कमी शब्दात खुप काही सांगून जाणारा हा टिझर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.

https://youtu.be/-cyWOnuO9f4

'बोगदा' हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून,या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित- दिग्दर्शित ‘बोगदा’ हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive