By  
on  

एकदम झक्कास! भेटीला येतेय अवधूत गुप्तेंची ‘कोल्हापूर डायरी’

‘कोल्हापूर डायरी’नावावरुनच तुम्हाला संगीतकार-गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते कोल्हापूरला फिरायला गेलेत की, काय असा तुमचा समज असेल तर असं अजिबातच नाही.अस्सल कोल्हापूरकर असलेले गुप्ते ‘कोल्हापूर डायरी’ हा आगामी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


अवधूत गुप्ते आणि निर्माते वजीर सिंग यांनी 'कोल्हापूर डायरी' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा एकत्रितरित्या सांभाळली आहे. जो राजन हे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे. अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या सुपरहिट मल्याळम सिनेमा ‘अंगमलइ डायरीज’चा हा रिमेक आहे.

सध्या या सिनेमाची टीम कोल्हापूरमध्ये असून इथे शेवटचे शेड्यूल पार पडत आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाबाबतची माहिती शेअर केली. अवधूत गुप्ते यांचे कोल्हापूर प्रेम आपल्याला माहितच आहे. त्यामुळे कोल्हापूरची झणझणीत मिसळ, लाल मातीतली कुस्ती आणि तिथलं अप्रतिम निसर्ग हे, यात पाहायला मिळणार यात काही शंका नाही.सिनेमातील कलाकार अद्याप गुलदस्त्यात असले तरी सर्वांनाच याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive