मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि सुपरस्टार असलेला हा अभिनेता आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकून घेतो. बालवयातच त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. श्रीकृष्ण या मालिकेतील त्याच्या प्रमुख भूमिकेचं प्रचंड कौतुक झाला. तेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता.
आता हा अभिनेता मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारव्हाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’ आणि ‘मुंबई-पणे-मुंबई सिरीज’ असे सुपरहीट सिनेमे देणारा हा आहे, अभिनेता स्वप्निल जोशी. आपल्या सोशल अकाउंटवरुन स्वप्नील जोशीने हा लहानपणीचा गोड फोटो अपलोड केला आहे. चेक्सचं शर्ट आणि फुलदाणीच्यामधून निरागस हसत त्याने कॅमे-याला पोझ दिली आहे. आता या फोटोला कॅप्शन देत तो म्हणतो, “ फोटोंमध्ये जुन्या आठवणींमध्ये रमण्याची केवढी मोठी ताकद आहे. खरंच खुप सुंदर आठवण आहे, ही लहानपणीची”
सहज-सुंदर अभिनयाचा ठसा उमटविणारा स्वप्निल आता सिनेमांसोबतच निर्मिती क्षेत्राकडेसुध्दा वळला आहे.