By  
on  

‘Impossible ते Unstoppable’ सुई धागा मेड इन इंडियाचा प्रवास उलगडतोय ट्रेलर

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा बहुचर्चित सिनेमा #SuiDhaagaMadeInIndiaTrailer चा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. मौजी या व्यक्तिरेखील वरूण आणि ममताच्या व्यक्तिरेखेत अनुष्का फार शोभून दिसतायत. एका सामान्य तरूणाची ही यशोगाथा आहे, ज्याला मनस्वी वागण्यामुळे कुटुंबिय, बाहेरील व्यक्ती सर्वचजण तिरस्कार करतात. पण मौजी, म्हणजेच वरूण मात्र मनमौजीच वागतोय. पण एक मात्र विशेष, या सर्वप्रसंगात त्याची पत्नी ममता त्याला प्रत्येक प्रसंगात साथ देतेय.

https://youtu.be/VUe3p23AJMo

नालायक असं, विशेषण पडलेल्या मौजीला स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी पत्नी ममता प्रोत्साहित करते आणि इथूनच सुरू होते मौजीची बेरोजगार ते रोजगार होण्याच्या प्रवासाची कहाणी. एक खुपच खुमासदार संवाद मौजी या ट्रेलरमध्ये म्हणतो, “शिव्याच खायच्या आहेत, तर त्या टाळ्यांच्या आवाजात मिळू देत. फुकटचे चप्पल काय कामाचे.” ही कथा आहे, एका सामान्य व्यक्तीच्या असमान्य संघर्षाची आणि अथक प्रयत्नांची. मौजी आणि ममता आपल्या उद्योगातून एक भारतीय ब्रॅंड उदयास कसे आणतात, हे सिनेमात पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाद्वारे मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यात आले आहे.

 

यशराज बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘सुई धागा मेड इन इंडिया’सिनेमात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा पारंपारिक देसी अवतार पाहायला मिळतोय. दोघंही प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र झळकत आहेत. दिल्ली, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणी हा सिनेमा चित्रित झाला आहे.

सर्वांनाच या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. शरत कटारिया दिग्दर्शित ‘सुई धागा मेड इन इंडिया’ 28 सप्टेंबर 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive