By  
on  

On location : जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीज

जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरी,हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि निर्माते वजीर सिंग यांनी ‘कोल्हापूर डायरी’ या सिनेमाच्या निर्मितीची धुरा एकत्रितरित्या सांभाळली आहे. या सिनेमातील कलाकार महेश शेट्टी यांनी नुकतंच या सेटवरील ऑन लोकेशनचा एक फोटो शेअर केला आहे. पोलिसांची फौज एका मालवाहू ट्रकची कसून चौकशी करत असल्याचे, या फोटोतून समजतेय.

 

अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या सुपरहिट मल्याळम सिनेमा ‘अंगमलइ डायरीज’चा ‘कोल्हापूर डायरी’ हा रिमेक आहे. एका शहराच्या प्रवास वर्णनावर हा सिनेमा आधारित असल्याचे समजते.

कोल्हापूर डायरी सिनेमाबाबत निर्माते वजीर सिंग फारच उत्सुक आहेत.

सध्या या सिनेमाची टीम कोल्हापूरमध्ये असून इथे शेवटचे शेड्यूल पार पडत आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन या सिनेमाबाबतची माहिती शेअर केली होती.अवधूत गुप्ते यांचे कोल्हापूर प्रेम आपल्याला माहितच आहे. त्यामुळे कोल्हापूरची झणझणीत मिसळ, लाल मातीतली कुस्ती आणि तिथलं अप्रतिम निसर्ग हे, यात पाहायला मिळणार यात काही शंका नाही. सर्वांनाच या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive