By  
on  

अभिनेत्री प्रीतम कागणे झळकणार डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत

‘हलाल, ‘31 ऑक्टोबर’, ‘संघर्षयात्रा’ या सिनेमातील अभिनायाचे कौतुक झाल्यानंतर अभिनेत्री प्रीतम कागणे आता ‘अहिल्या’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. खास या भूमिकेसाठी प्रीतमनं बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं आहे .

सुधीर चारी निर्मित ‘अहिल्या’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. नितीन तेंडुलकर यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. सिनेमात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या सिनेमात मांडण्यात आली आहे.

प्रीतमनं या सिनेमातील भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्या विषयी प्रीतम म्हणते, “पोलिस अधिकाऱ्याची भूमिका मी या पूर्वी कधी केलेली नाही. ‘अहिल्या’ सिनेमानं ती संधी दिली. पोलिसांच्या जगण्याचे विविध कंगोरे या भूमिकेला आहेत. या भूमिकेसाठी फिजिकल फिटनेस वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे सायकलिंग, स्वीमिंग, कराटे करायला मी शिकले. दोन महिन्यांचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं. मुख्य आव्हान होतं ते, बुलेट शिकणं... बुलेट शिकताना चार-पाच वेळा धडपडलेही. मात्र, हार न मानता बुलेट चालवायला शिकले. त्यामुळे या भूमिकेला जीवंत करता आलं. या सिनेमासाठी मीही खुप उत्सुक आहे.”

‘अहिल्या’ सिनेमाबरोबरच प्रीतमचा ‘मान्सून फुटबॉल’ आणि आणखी तीन सिनेमे लवकरच येणार आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive