By  
on  

परिणीती आणि अर्जुन म्हणतायत,‘Namaste England’

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या आगामी नमस्ते इंग्लड या सिनेमाचं नवं #NamasteEnglandPoster लॉंच करण्यात आलं आहे. पहिल्या पोस्टरमध्ये परिणीती पांढ-या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसतेय आणि तिने इंग्लडच्या झेंड्याला ओढणी म्हणून घेतलं आहे, तर अर्जुन रागवलेल्या अंदाजात दिसतोय. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्कजादेनंतर अर्जुन आणि परिणीती ही जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे. पोस्टरवरुनच दोघांची केमिस्ट्री या सिनेमात छान जुळून येणार असल्याचे दिसून येत आहे.

https://twitter.com/arjunk26/status/1029221658610094081

नमस्ते इंग्लडच्या दुस-या पोस्टरवर अर्जुनने इंग्लडच्या झेंड्याचा टी-शर्ट घातला असून आपलं ब्लेझर उडवत परिणीतीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. यापूर्वीसुध्दा या सिनेमाचे अनेक पोस्टर लॉंच करण्यात आले होते. नमस्ते लंडनच्या शुटींगला अमृतसरमधून सुरूवात करण्यात आल्याची माहिती यापूर्वी प्रसिध्द झाली होती.

नमस्ते लंडनचे दिग्दर्शन करणारे विपुल शाहच नमस्ते इंग्लडचे दिग्दर्शन करत आहेत. कतरिना कैफ आणि अक्षय कुमार या जोडीने पहिल्या भागांत प्रेक्षकांवर जादू केली होती. आता नमस्ते इंग्लड सिनेमातून परिणीती आणि अर्जुन आपल्या रोमॅण्टीक आणि कॉमेडीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नमस्ते इंग्लड हा सिनेमा यंदा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive