By  
on  

प्रार्थनाने केली वैभवच्या सिनेमाची घोषणा

मराठी सिनेसृष्टीतला टॉल, डार्क आणि हॅण्डसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे वैभव तत्त्ववादी. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा त्याने आपलं स्वत:चा एक ठसा उमटवला आहे. लवकरच वैभव एका नवीन सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबतची घोषणा नुकतीच वैभवने सोशल मिडीया अकाऊंटवरुन केली आहे. ग्रे असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही जोडी प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची आहे. कॉफी आणि बरंच काही, मि अॅंड मिसेस सदाचारी आणि व्हॉट्सअप लग्न या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री मस्त जुळून आली. सर्वांनाच त्यांना पुन्हा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वैभवच्या ग्रे या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमात त्याच्यासोबत प्रार्थना नाही तर पल्लवी पाटील आणि मयुरी देशमुख असल्याचे समजत आहे. परंतु सिनेमाबाबतचा सविस्तर उलगडा अद्यापतरी झालेला नसला तरी महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा नवरा अभिषेक जावकर याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. म्हणूनच तिने वैभवची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 2019ला प्रदर्शित होईल, असे पोस्टरवरुन कळते.

https://www.instagram.com/p/BmfaHyjHS9k/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control

वैभव मराठीसोबतच हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकला. बाजीराव मस्तानी सिनेमातील त्याने साकारलेले चिमाजी अप्पा नेहमीच लक्षात राहतात. त्याचबरोबर हंटर, लिपस्टीक अंडर माय बुरखा यांसारखा सिनेमांतूनही त्याच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive