By  
on  

मराठी सिनेमाच्या ‘छकुल्या’चा आज आहे वाढदिवस, ओळखलं का कोण आहे तो?

आदिनाथ कोठारे हे नाव मराठी सिनेमासृष्टीला नवं नाही. आदिनाथच्या अभिनयाचा करिष्मा अगदी लहान वयापासून मराठी प्रेक्षकाने अनुभवला आहे. लहानपणी ‘माझा छकुला’मधून आदिनाथने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याच्या निरागस अभिनयाला त्यावेळी रसिकांनी पसंतीची पावती दिली. ही तर त्याच्या अभिनय करीअरची पहिली पायरी होती. खरं तर मराठीतील एका यशस्वी अभिनेत्याचं नाव मागं असूनही आदिनाथला स्वत:ची ओळख निर्माण करायची होती.

त्यामुळेच त्याने शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ‘चिमणी पाखरं’, ‘शुभमंगल सावधान’ ‘पछाडलेला’ आणि ‘खबरदार’ या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर ‘स्टॅँड बाय’, ‘दुभंग’, ‘सतरंगी रे’ अशा सिनेमांमधून त्याने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या.

https://www.instagram.com/p/BxZisoLnroe/?utm_source=ig_web_copy_link

पण आदिनाथ सगळ्यांच्या नजरेत आला ते ‘झपाटलेला २’ मुळे. वडिलांच्या दिग्दर्शनाखाली या मराठीतील पहिल्या 3डी सिनेमात आदिनाथने स्वत:ची छाप सोडली. त्यानंतर आदिनाथच्या करीअरला चांगलाच वेग आला.

https://www.instagram.com/p/BxRPqfPBUOa/?utm_source=ig_web_copy_link

सहायक दिग्दर्शन आणि अभिनयात कस आजमावल्यानंतर आदिनाथने ‘कोठारे अ‍ॅन्ड कोठारे व्हिजन’ची धुरा हाती घेतली आहे. या बॅनरखाली आदिनाथने ‘फुल 3 धमाल’, ‘झपाटलेला २’ आणि ‘खबरदार’ या सिनेमांच्या निर्मितीची धुराही सांभाळली. आदिनाथच्या प्रोफेशनल लाईफइतकंच पर्सनल लाईफही इंटरेस्टींग आहे.

‘शुभमंगल सावधान’ या सिनेमादरम्यान त्याच्या ‘लेडी लव्ह’ म्हणजेच उर्मिला कानेटकरशी ओळख झाली. आपल्या स्टाईल अनेकांना प्रेमात पाडणारा हा अभिनेता उर्मिलाच्या प्रेमात मात्र पाहताक्षणी पडला. एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी २० डिसेंबर २०११ ला लग्नबंधनात अडकली. या क्युट कपलला जिजाच्या रुपाने एक सुंदर गिफ्ट मिळालं आहे.

आदिनाथ सध्या बॉलिवूडच्या बहुचर्चित ‘83’ या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे तो ‘पाणी’ सिनेमाच्या निमित्ताने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराला ‘पीपिंगमून’कडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...

Recommended

PeepingMoon Exclusive