By  
on  

नागराज आता घेऊन आला ‘बिबट्या’, सोशल मिडियावर केली घोषणा

नागराज मंजुळे हे नाव माहिती नसेल अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. नागराजच्या नवीन सिनेमासाठी रसिकदेखील खुप उत्सुक असतात. नागराजने नुकताच सोशल मिडियावर ‘बिबट्या’ लघुपटाविषयी माहिती दिली आहे. या लघुपटाची प्रतिष्ठीत कान्स महोत्सवाची निवड झाली आहे. विशेष म्ह्णजे नागराज या लघुपटाच्या निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. नागराजच्या दिग्दर्शनाच्या हटके स्टाईलने आजवर रसिकांना मोहिनी घातली आहे. आता रसिकांना नागराजच्या निर्मितीचा पैलू आजमावता येणार आहे.

https://www.instagram.com/p/BxWLh7cpVmF/?utm_source=ig_web_copy_link

बिबट्या लघुपटाचं दिग्दर्शन गार्गी कुलकर्णी यांनी केलं आहे. पोस्टमध्ये गार्गीचं अभिनंदन करताना नागराज म्हणतो, ‘गार्गी कुलकर्णी Gargee Kulkarni
दिग्दर्शित लघुपट "बिबट्या" कान्समध्ये. गार्गीच्या तीन वर्षांच्या मेहनीतला रंग आला याचा फार आनंद आहे. अभिनंदन टीम आटपाट !!!’ यासोबत सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं आहे. यात एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलगी चालत जाताना दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive