By  
on  

सुव्रत जोशी बनला आचारीबुवा, त्याचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेलं क्युट कपल म्ह्णजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. नेटिझन्सनी या जोडीच्या लग्नातील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसदेखील पाडला. पण सुव्रत सध्या बनला आहे आचारीबुवा ! ते पण लाडक्या बायकोसाठी अलीकडेच सुव्रतचा एक फोटो सोशल मिडियावर पाहण्यात आला. यात सुव्रत किचनमध्ये मन लावून स्वयंपाक करताना दिसत आहे. याला कॅप्शन #sulaachaaswaympak असं आहे. त्यामुळे सुव्रत नक्कीच सखीसाठी काहीतरी स्पेशल बनवत असेल यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/Bxg4p0khz3f/?utm_source=ig_web_copy_link

दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनिमित्त हे दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांनासुध्दा कळलं नाही. एरवी एकत्र असणा-या या दोघांना जेव्हा नात्याबद्दल विचारलं गेलं त्यावेळी मात्र दोघांनीही नकार दिला. पण दोघांचं नातं फार काळ लपून राहू शकलं नाही. एकमेकांची साथ देण्याचं वचन देत ही जोडी ११ एप्रिलला विवाह बंधनात अ‍डकली.

Recommended

PeepingMoon Exclusive