'के दिल अभी भरा नही' नाटकाचा २५० वा प्रयोग उत्साहात संपन्न
सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं 'के दिल अभी भरा नही' या नाटकाचा २५० वा प्रयोग काल बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात संपन्न झाला. नाट्यरसिकांची हाऊसफुल गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला. या प्रयोगाला सचिन-सुप्रिया पिळगावकर, सचिन खेडेकर, रोहिणी हट्टंगडी, एन चंद्रा आदी मान्यवरांनी या प्रयोगाला हजेरी लावली.
प्रयोग झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी नाटकाचं भरभरून कौतुक केलं. या नाटकाचे पुढे ५०० आणि १००० प्रयोग होवोत, अशी सदिच्छा त्यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमला दिली. तसेच नाटकाच्या प्रमुख कलाकारांनी सर्वांसोबत केक कापून २५०व्या प्रयोगाचं जोरदार सेलिब्रेशन केलं.
या नाटकाच्या सुरुवातीच्या काही प्रयोगात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री रीमा प्रमुख भूमिका साकारायचे. त्यांनतर मंगेश कदम आणि लीना भागवत हे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. मंगेश कदम यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं असून शेखर ढवळीकर यांनी हे सुंदर नाटक लिहिलं आहे.