By  
on  

पहा 'मिस यु मिस्टर' या सिनेमाचा लव्हेबल टीजर प्रदर्शित

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेला 'मिस यु मिस्टर' या सिनेमाची मराठी सिनेविश्वात जोरदार चर्चा आहे. सिद्धार्थ चांदेकरने याआधी स्वतःच्या इंस्टाग्रामवरून या सिनेमाचं हटके प्रोमोशन केलं आहे. नुकताच या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये सिद्धार्थ आणि मृण्मयी एकमेकांशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बोलत असलेले दिसून येत आहेत.

सिद्धार्थ या सिनेमात वरुण तर मृण्मयी कावेरीच्या भूमिकेत आहे. कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या नवरा बायकोची गोष्ट या सिनेमात गुंफण्यात आली आहे. या सिनेमात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदी कलाकार सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. हा वेगळा सिनेमा २१ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive