By  
on  

‘तेनू लेके में जावॉं गां’.... प्रियंकासाठी निकचे कुटुंबिय भारतात

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडते आहे. पण सध्याची चर्चा तिच्या सिनेमांपेक्षा तिचा विदेशी बॉयफ्रेंड निक जोनस आणि तिच्या नात्याची. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांनासुध्दा उधाण आले होते. जिथे तू तिथे मी अशाप्रकारेच हे प्रेमीयुगूल हिंडताना दिसतंय. सिंगापूरमधील निकच्या कॉन्सर्टमध्ये प्रियंका निकसोबतच होती. सध्या मुंबईत ती आपला सिनेमा ‘स्काई इज पिंक’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे निक जोनस याचे काल रात्री मुंबईत आगमन झालं असून विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याचे आई-वडिलसुध्दा आहेत. मुंबई एअरपोर्टवर त्यांना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचे इतर कुटुंबियसुध्दा लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते आहे. यापूर्वीसुध्दा निक भारतात आले आहे. दोघांच्याही कुटुंबियांकडून प्रियंका-निकच्या साखरपुड्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करणार असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान प्रियंकाच्या घरी शानदार पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती असून सध्या प्रियंकाच्या मुंबईतील घरी खुपच रेलेचेल पाहायला मिळणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये प्रियंकाच्या घरासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या होत्या. ज्यात एका पंडितजींना घराबाहेर पडताना स्पॉट करण्यात आलं होतं, तर सध्या घराची रंगरंगोटी आणि रोषणाईचं कामसुध्दा जोरदार सुरू असल्याने कोणत्यातरी शुभकार्याची ही तयारी असणार हे नक्की! प्रियंका 18 ऑगस्टला देणार असलेल्या जंगी पार्टीसाठी मुंबईतील 5 स्टार हॉटेल बुक करण्यात आले असून यात प्रियंकाचे सर्व जवळचे मित्र, नातेवाईक आणि निकचे कुटुंबिय सहभागी होतील. या पार्टीचे निमंत्रण सर्वांना यापूर्वीच पाठविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियंका जेव्हा भारतात आली, तेव्हा दिल्ली विमानतळावर प्रियंका उतरली,. विमानतळाबाहेर येताना प्रियंकाने हातातली अंगठी गुपचूप आपल्या बॅगेत ठेवली.आपल्याला कोणी पाहत नाही,असेच तिला वाटले. मात्र कॅमे-याने तिला अचूक कैद केलं होतं. त्यामुळेच प्रियंका-निकच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर आता लवकरच अधिकृतचा ठसा उमटणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive