स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेला सुरुवात झाली आहे. बाबासाहेबांची जीवनगाथा रमाबाईंच्या उल्लेखाशिवाय अपुर्ण आहे. या मालिकेत रमाबाई साकारत आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. तिचा रमाबाई साकारण्याचा अनुभव कसा होता हे वाचूया तिच्या शब्दात
रमाबाई साकारणं हे माझ्यासाठी खरंच आव्हानात्मक होतं. कारण मी आतापर्यंत बबली किंवा गर्ल नेक्स्ट डोअरची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत वेगळा आहे. मी पहिल्यांदाच अशी व्यक्तिरेखा साकारत आहे. मी रमाबाईंचा अभ्यास करायला सुरु केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, रमाबाईंचं आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी आहे. ही भूमिका साकारणं यासाठी आव्हानात्मक होतं कारण हा काळ पुर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे मला काळाच्या पलीकडे या भूमिकेने नेलं. त्यासाठी मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते.
https://www.instagram.com/p/Bx2IJgClQtB/?utm_source=ig_web_copy_link
रमाबाईंचा काळ वेगळा आहे. त्यावेळच्या रिती, भाषा, प्रावरणं हे सगळं खुप वेगळं आहे. या सगळ्याशी समरस होणं हे माझ्यासाठी खुप आव्हानात्मक आहे. पण आमची क्रिएटीव्ह टीम, सागर आणि दिग्दर्शक यांच्यासोबत रिसर्च करून आणखी व्यक्तिरेखा समजून घेत आहेत. मला रमाबाई साकारण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते.’