By  
on  

'परी हूँ मैं’ सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न

योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे मोठ्या शानदार पध्दतीने संपन्न झाला. अष्टपैलू व्यक्तीमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कँब्रिज विद्यापीठातील टॉपर आणि यंग भारतीय फाउंडेशनचे संस्थापक श्री. अमेय प्रताप सिंह यांच्या हस्ते ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आले. योगायतन ग्रुपचे चेअरमन डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि श्रीमती शीला सिंह चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शन रोहित शिलवंत यांनी केले आहे.

अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटाला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०१८’ मध्ये उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि उत्कृष्ट मराठी अभिनेत्री असे दोन मानाचे पुरस्कार मिळाले असू आंतररा।ट्रीय चित्रपट महोत्सवातुध्दा या सिनेमाला गौरविण्यात आले आहे.

‘परी हूँ मैं’ या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये साजीरी दिघे ऑडिशन देताना दिसते, तिच्या बोलक्या आणि निरागस अभिनयातून तिला एका मालिकेत परी नामक ऐश्वर्यसंपन कुटुंबातील लाडक्या मुलीची भूमिका साकारायची संधी मिळते. साजरीचे वडील माधव दिघे हे तिच्याबाबत संवेदनशील आणि अतिशय महत्वाकांक्षी असून शुटिंगच्या वेळी ते तिच्यासमवेत सावलीप्रमाणे राहतात. तर दुसरीकडे अभिनयाच्या आणि झगमगाटाच्या दुनियेत आपल्या मुलीचे बालपण कुठे हरवू नये, याची तिच्या आईला काळजी आहे. प्रसिद्धी मिळाल्यानंतर साजीरी आणि तिच्या कुटुंबात होणाऱ्या बदलांचा वेध ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात घेतल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. चंदेरी दुनियेकडे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या ध्येयपूर्तीची वाटचाल सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=jPr-GS1gPNs&feature=youtu.be

‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत.प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहे. शंकर महादेवन यांनी ‘वेगे वेगे धावू’ हे गीत गायले असून अमृता फडणवीस यांनी ‘चंदण बिलोरी’ ही अंगाई तर मंदार पिलवलकर यांनी ‘चंदण बिलोरी’चे मेल व्हर्जन गायले आहे. ‘परी हूँ मैं’ चे शीर्षकगीत जिया वाडकर हिने गायले असून तिचे हे पहिलेच पार्श्वगायन आहे.

बहुचर्चित मध्यमवर्गीय दिघे कुटुंबातील साजिरी ‘परी’ येत्या 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive