By  
on  

56 व्या राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वानंद किरकिरे यांना मिळाला हा पुरस्कार

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे 'मराठी चित्रपट पुरस्कार' प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात स्वानंद किरकिरे यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' हा पुरस्कार मिळाला. स्वानंद किरकिरे यांना 'चुंबक' सिनेमासाठी हा पुरस्कार मिळाला. या सिनेमात त्यांनी प्रसन्न ही व्यक्तिरेखा साकारली होती. या सोहळ्याला स्वानंद स्वतः उपस्थित नव्हते तरी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांचे आणि परीक्षकांचे आभार मानले.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive