‘तेरे हात में....’ हातात हात घालून फिरतायत निक आणि प्रियंका

By  
on  

प्रियंकाचा विदेशी बॉयफ्रेंड निक आणि त्याचे कुटुंबिय भारतात आल्यापासून त्या दोघांच्या अधिकृत साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आज 18 ऑगस्ट रोजी प्रियंका आणि तिचे कुटुंबिय यांनी आपले भावी व्याही जोनस कुटुंबियांसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले आहे. प्रियंकाने लंडनमध्ये तिच्या वाढदिवशी निकसोबत साखरपुडा केला असल्याचे बोलले जात असून याबाबतची अधिकृत घोषणा आजच्या पार्टीत केली जाणार आहे. पण या पार्टीपूर्वीच शुक्रवारी या लव्हबर्ड्सना रोमॅँण्टीक डिनर डेटला जाताना कॅमे-याने कैद केले आहे. यावेळी दोघेही सर्व जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या हातात हात घालून फिरण्यात मश्गूल होते. यावेळी प्रियंकाच्या हातातील अंगठी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

प्रियंकाची आई मधू चोप्रा यासुध्दा यादरम्यान खुप छान मूडमध्ये दिसल्या. प्रियंका आणि निकच्या साखरपुड्याच्या या फक्त अफवा नसून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे बॉलिवूड सूत्रांकडून समजतेय.

प्रियंका आज 18 ऑगस्टला  देणार असलेल्या जंगी पार्टीसाठी मुंबईतील 5 स्टार हॉटेल बुक करण्यात आले असून यात प्रियंकाचे सर्व जवळचे मित्र, नातेवाईक आणि निकचे कुटुंबिय सहभागी होतील. या पार्टीचे निमंत्रण सर्वांना यापूर्वीच पाठविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियंका जेव्हा भारतात आली, तेव्हा दिल्ली विमानतळावर प्रियंका उतरली, विमानतळाबाहेर येताना प्रियंकाने हातातली अंगठी गुपचूप आपल्या बॅगेत ठेवली.आपल्याला कोणी पाहत नाही,असेच तिला वाटले. मात्र कॅमे-याने तिला अचूक कैद केलं होतं. त्यामुळेच प्रियंका-निकच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर आता लवकरच अधिकृतचा ठसा उमटणार आहे.

Recommended

Loading...
Share