By  
on  

प्रेक्षकांच्या लाडक्या 'आर्ची'ला बारावीच्या परीक्षेत 'सैराट' यश

प्रेक्षकांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिने घवघवीत यश संपादन केलं आहे. आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून रिंकूला या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले आहेत.

एकूणच रिंकूचं अभिनयालं करियर सध्या उत्तम सुरु असून अभिनयसोबतच तिने शिक्षणालासुद्धा तितकेच महत्व दिले आहे. रिंकूला या परीक्षेत ६५० पैकी ५३३ गुण मिळाले आहेत.

'मेकअप' हा रिंकूचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी रिंकूने 'सैराट' आणि 'कागर' या दोन सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'सैराट' सिनेमामुळे रिंकू राजगुरू प्रचंड लोकप्रिय झाली. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'कागर' या सिनेमातील रिंकूच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. तसेच अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या आगामी सिनेमात रिंकू विशेष भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/BxNVB91JUFX/

Recommended

PeepingMoon Exclusive