संग्रामचा ‘कूल’ अंदाज जिंकणार कि अमृताचा राग नडणार, नवी मालिका ‘मी तुझीच रे’

By  
on  

असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात युद्धात सगळं माफ असतं’ सोनी मराठीवरील मी तुझीच रे या नव्या मालिकेत प्रेमाची सुरुवातच युद्धाने झाली आहे. रसिकांच्या मनोरंजनाची हमी देणा-या सोनी मराठीने एका फ्रेश लव्हस्टोरी भेटीला आणली आहे. ‘मी तुझीच रे’ या मालिकेच्या निमित्ताने संग्राम साळवी आणि अमृता देशमुख ही जोडी पहिल्यांदाच समोर येत आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

https://twitter.com/sonymarathitv/status/1133245702539104259

या प्रोमोमध्ये अमृता श्रीमंत बिल्डरच्या भुमिकेत दिसत आहे. जिला मुलांच्या खेळण्याच्या ग्राउंड्वर कब्जा करायचा असतो. पण संग्राम साळवी या मुलांचा नेता बनून तिला असं करण्यास अडवतो. अशा प्रकारे पहिल्याच भेटीत या दोघांच्यात ३६चा आकडा निर्माण झालाय. पुढे यांच्या नात्याचं काय होतंय ते कळेलच लवकर. ही मालिका २४ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share