‘बिग बॉस’च्या घरात आज झाली पहिल्या टास्कची नांदी

By  
on  

बिग बॉसच्या घरात आता कुठे खेळाला रंग चढू लागला आहे. या घरात नॉमिनेशनच्या उंबरठ्यावर असलेल्या अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे यांना टीमच्या नेतृत्वाची संधी दिली. बिचुकले आणि माडे या आठवड्यासाठी सुरक्षित आहेत. या घरात आज पहिल्यांदा या सीझनचं आणि नव्या घरातील पहिलं टास्क आज बिग बॉसनी जाहीर केलं. ‘सवाल ऐरणीचा’ असं या टास्कचं नाव आहे.

घरातील सदस्यांनी आजही नेहमीप्रमाणे अभिजीत बिचुकलेंना सगळ्यांनी टारगेट केलं होतं. पण बिचुकले मात्र फोडाफोडीचं राजकारण करण्यात जराही मागे रहात नाही आहेत. बिचकुलेने शिवानीला हाताशी धरुन स्वतःच्याच ग्रुपमधली मेम्बर नेहाला घराबाहेर काढायचा प्लॅन काढला. परंतु शिवानीने नेहाला हे सांगीतलं... आणि बिचुकलेचं पितळ उघडं पडलं. यावेळी चर्चा करत असताना सतत दुर्लक्ष करत असल्याने माधव देवचके बिचुकलेवर चांगलाच भडकला. सवाल ऐरणीच्या या पहिल्या खेळाला सुरुवात... नेहा आणि शिवानी आमनेसामने आता उद्याच्या भागात टास्क कोण जिंकतो हे पाहण्यात खरी रंगत येईल.

Recommended

Loading...
Share