घराची संकल्पना सांगू पाहणारा 'वेलकम होम' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

By  
on  

'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे.  लेखन सुमित्रा भावे यांनी सिनेमाची पटकथा लिहिली असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन लेखन केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=fGJrEXITb9Y&feature=youtu.be

या सिनेमात मृणाल कुलकर्णी आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका असून स्पृहा जोशी, सुबोध भावे, प्रसाद ओक,सुमित राघवन, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

उत्तम आणि आशय संपन्न कथानकाला नेत्रसुखद दृश्य, श्रवणीय संगीत आणि सुंदर अभिनयाची जोड मिळाल्याचं या ट्रेलरमधून पहायला मिळतं. आजवर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी अनेकसिनेमे केले असले, तरी हा सिनेमाची जातकुळी काहीशी वेगळी असल्याचं या ट्रेलरवरून जाणवतं. त्यामुळेच 'वेलकम होम' विषयी प्रेक्षकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं आहे.

Recommended

Loading...
Share