अभिनेता आदिनाथ कोठारेने शेअर केला ‘83’ च्या टीमसोबतचा हा फोटो

By  
on  

येत्या काहीच दिवसात क्रिकेट वर्ल्डकप सुरु होत आहे. पण त्याआधी चर्चा आहे ती कबीर खानच्या ‘83’ सिनेमाची. दिग्दर्शक कबीर खान १९८३मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या टीमचा बायोपिक बनवत आहेत. यात रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेत आहे. आदिनाथ कोठारेही या सिनेमात दिलीप वेंगसरकर यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. आदिनाथने नुकताच टीममेट्ससोबतचा फोटो शेअर केला आहे. यात प्रत्येक कलाकार सुटबूटमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BxuI24LHR2j/?utm_source=ig_web_copy_link

या सिनेमात रणवीर सिंग, आर बद्री, हैर्र्डी संधू, चिराग पाटील, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन, एमी विर्क आणि साहिल खट्टर, आदिनाथ कोठारे हे कलाकार आहेत. या सिनेमाचं शुटिंग धरमशाला, लंडन, स्कॉटलंड इथे झालं आहे. कृष्णम्माचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विकेटकीपर सय्यद किरमानी यांची व्यक्तिरेखा युट्युब स्टार साहिल खट्टर साकारणार आहे. तर संजय पाटील यांची व्यक्तिरेखा चिराग पाटील साकारणार आहेत.  याशिवाय अभिनेता आदिनाथ कोठारे या सिनेमात दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share