By  
on  

अनावश्यक सलगी टाळण्यासाठी माधव देवचकेने अभिजीत बिचुकलेला दिला हा सल्ला

सलग दोन दिवसांच्‍या ड्रामानंतर आम्‍हाला 'बिग बॉस मराठी'च्‍या तिस-या दिवसाच्‍या काही छुप्‍या घटनांबाबत समजले आहे. वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये स्‍पर्धक माधव देवचके अभिजीत बिचुकलेच्‍या इतरांना जाणूनबुजून स्‍पर्श करण्‍याच्‍या स्‍वभावाबाबत नाराज होताना दिसत आहे. माधव व दिगंबर त्‍याला समजावत आहेत की, या वागणूकीमुळे त्‍याच्‍या अवतीभोवती असलेल्‍या लोकांना गैरसोयीचे वाटत आहे.

माधव म्‍हणतो, ''थोडं टची कमी राहिलेले बेटर. का माहित आहे का? काही-काही लोकांना सवय नसते, ते इरिटेट होतात.'' पण समस्‍या जाणून घेण्‍याऐवजी अभिजीत बिचुकले त्‍यांचे म्‍हणणे परतवून लावण्‍याचा प्रयत्‍न करतो आणि म्‍हणतो, ''आपल्‍या स्‍ट्रॅटेजीमध्‍ये माझ्या स्‍पर्शाला कधी-कधी मान द्या. म्‍हणजे चालला आहे टास्‍क कधी आणि मी खांद्यावर हाथ ठेवला...''
अभिजीत बिचुकलेची प्रतिक्रिया माधवला स्‍तब्‍ध करते आणि तो महिला व पुरूषांना स्‍पर्श करण्‍यामध्‍ये किती फरक आहे, याबाबत आपला दृष्‍टीकोन सांगणे सुरूच ठेवतो. अभिजीत बिचुकले जिद्दी असल्‍यामुळे त्‍याला कुणाचेही ऐकून घ्‍यायचे नाहीये आणि तो माधवच्‍या सल्‍ल्‍याचे खंडन करतो.
*बिचुकलेला त्‍याची चूक उमजून तो माधवचा सल्‍ला गांभीर्याने घेईल का?  Voot वर तुम्हाला बिग बाॅसमधील असेच Unseen Episode पहायला मिळतील...

Author

Recommended

PeepingMoon Exclusive